Skip to main content

वजन कमी करण्यासाठी मदत

 आपल्या आहारातील पोषण द्रवे,जीवनसत्वे,आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजार  जसे *थायरॉईड,बीपी, डायबेटिक, ओबेसिटी,पोटाचे आजार,जॉइंट दुखणे, PCOD, PCOS ओबेसिटी, Acidity, Migration,पोटाचे विकार सुरू होतात.* यावर उपाय..... *BTC.... मध्ये सहभागी व्हायचे...यात आपल्याला काय शिकायला मिळते...* *1.कमी कॅलरी युक्त आणि भरपूर Nutrition युक्त आहार जो आपले वजन मेन्टेन ठेवण्यासाठी उपयोगी आहे  2. शरीरातील पोषण द्रव ,व्हिटॅमिन,मिनरल ची  कमतरता भरून काढणारा ब्रेकफास्ट. 3. स्पेशल Healtthy मिल प्लॅन. 4. स्पेशल Healtthy Reciepi. 5. Daily hole body Workout Exercises. 6 .Personal Gaidance.* Admition साठी खालील लिंक वर क्लिक करून वजन उंची पाठवा. Registration fee 500 Rs. https://wa.me/919309026635?text=I-Want-%20to-Joi!n--Health-join-BTC

बोधकथा



              *"तुळसीचे महत्त्व"*

     *एक दिवस बिरबल व बादशहा संध्याकाळी फिरण्यासाठी नदीकाठी गेले. तेथे एका देवळासमोर काही हिंदू स्त्रिया तुळशीची पूजा करीत होत्या. ते पाहून बादशहाने बिरबलाला विचारले. 'नदीवर असंख्य जातीची झाडे, लता, फुलझाडे असताना या हिंदू स्त्रिया तुळशीचीच का बरे पूजा करतात?' बिरबल म्हणाला, 'महाराज, तुळस ही भगवान श्रीकृष्णाला फारच प्रिय होती व तो ती सदैव आपल्या गळ्यात धारण करत असे.' बिरबलचे उत्तर ऐकून बादशहा कुचेष्टेने हसला व म्हणाला, 'अरे भगवान श्रीकृष्ण म्हणाजे तुम्हा हिंदुंचा देव आहे ना? मग गळ्यात घालण्यासाठी त्याला एखादी सोन्याची माळ मिळाली नाही का? तुमचे देवच जर तुळशीच्या माळा घालण्याएवढे दरिद्री आहेत तर हिंदू लोकांना तो काय देऊ शकणार?' बिरबल म्हणाला, 'महाराज, आपल्या या प्रश्नांचे उत्तर मी काही दिवसांनी देईन.'*

    *पावसाळ्यात बादशहाच्या मुलाला म्हणजेच राजपुत्राला खूप सर्दी खोकला झाला व तो काही केल्या बरा होईना. बिरबलने एका नामवंत वैद्यांकडून तुळशीचा व अन्य औषधी वनस्पतीचा अर्कयुक्त काढा तयार करवून घेतला. तुळशीचा काढा राजपुत्राला पाजून त्याने राजपुत्राला गळ्यात तुळशीच्या दोन माळा घालण्यासाठी दिल्या.*

    *दुसऱ्याच दिवसापासून राजपुत्राची तब्येत सुधारू लागली. बिरबलाने कोणते औषध दिले त्याची चौकशी करण्यासाठी बादशहा तिथे आला. तेव्हा त्याने पाहिले की राजपुत्राने तुळशीच्या माळा गळ्यात घातल्या आहेत. बादशहाने सर्व चौकशी केल्यावर त्याला तुळशीचे महत्त्व उमजले व त्याने बिरबलाला बोलावून त्याच्या गळ्यात सोन्याची माळ घातली. त्यापुढे तब्येत बिघडल्यावर बादशहासुद्धा नियमाने तुळशीचा काढा पिऊ लागला व गळ्यात तुळशीची माळा घालू लागला..
       
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

Comments