Skip to main content

वजन कमी करण्यासाठी मदत

 आपल्या आहारातील पोषण द्रवे,जीवनसत्वे,आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजार  जसे *थायरॉईड,बीपी, डायबेटिक, ओबेसिटी,पोटाचे आजार,जॉइंट दुखणे, PCOD, PCOS ओबेसिटी, Acidity, Migration,पोटाचे विकार सुरू होतात.* यावर उपाय..... *BTC.... मध्ये सहभागी व्हायचे...यात आपल्याला काय शिकायला मिळते...* *1.कमी कॅलरी युक्त आणि भरपूर Nutrition युक्त आहार जो आपले वजन मेन्टेन ठेवण्यासाठी उपयोगी आहे  2. शरीरातील पोषण द्रव ,व्हिटॅमिन,मिनरल ची  कमतरता भरून काढणारा ब्रेकफास्ट. 3. स्पेशल Healtthy मिल प्लॅन. 4. स्पेशल Healtthy Reciepi. 5. Daily hole body Workout Exercises. 6 .Personal Gaidance.* Admition साठी खालील लिंक वर क्लिक करून वजन उंची पाठवा. Registration fee 500 Rs. https://wa.me/919309026635?text=I-Want-%20to-Joi!n--Health-join-BTC

कृती पत्रिका बनवणे.

 १)सर्वप्रथम ज्या इयत्तेची कृती पत्रिका बनवायची आहे, तिचे पाठ्यपुस्तक घेऊन त्यातील अध्ययन निष्पत्ती वाचाव्यात. अध्ययन निष्पत्ती या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीस  अनुक्रमणिका च्या आधीच्या पानांमध्ये दिलेल्या आहेत. 

अध्ययन निष्पत्ती या साध्य करून घेण्यासाठी किमान कोणकोणत्या कृती करता येतील याची माहिती सुद्धा दिली आहे. *शिक्षकांसाठी*  या पानावर शिक्षकांकडून कोणकोणत्या अपेक्षा या इयत्तेसाठी आहेत याचे विवेचन आहे. 


त्यातील ज्या अध्ययन निष्पत्ती साध्य करून घ्यायच्या आहेत म्हणजेच ज्याच्यावर कृतीपत्रिका बनवणे अपेक्षित आहे त्या *अध्ययन निष्पत्ती चढत्या क्रमाने* मांडाव्यात.

 उदाहरणार्थ: 

१)अध्ययन निष्पत्ती आहे *चित्रातील अथवा चित्र मालिकेतील घडणाऱ्या वेगवेगळ्या कृती आणि पात्र यांना एकसंधपणे पाहून कृती करतात.*

यात चित्र अथवा चित्र मालिका द्यायला हवी. 

त्याला अनुसरून वेगवेगळ्या कृती निश्चित करायला हव्यात.

 तसेच चित्रमालिकेत काही पात्र हवीत.

 त्या  पात्रांच्या मध्ये एकसंधपणे काही कृती हवी. 

याला अनुसरून  *कृतींची आखणी* हवी. 

यासाठी मी _छोटा भीम_ हे कार्टून पात्र निवडलं. त्याची ही कृती निवडली की तो कायम मित्रांच्या सोबत असतो आणि ते एकमेकांना मदत करतात. ..

*कृतींची मांडणी* करण्यासाठी मी भूमिका बदल हे तंत्र निवडले. 


यासाठी मी काही चित्र घेतली ज्यामध्ये छोटा भीम आणि त्याचे मित्र आहेत. दुसऱ्या चित्रात एकमेकांना मदत करताना दाखवले. नंतरची दोन चित्र बाकीच्या लोकांना मदत करताना दाखवली.

पालकांना सूचना देताना असं सांगितलं की चित्र दाखवा, त्यावर चर्चा करा, आणि विद्यार्थ्याला छोटा भीम करून त्या चित्र सारखं  आईला मदत कर.

(यात बदल काहीही असू शकतो माझ्यापेक्षा छान तुम्ही करू शकता मी फक्त एक नमुना सांगत आहे)


आणि पालकांना सांगितल तुम्ही मुलाने हा अभिनय कसा केला याबाबत तुमचा अभिप्राय नोंदवा. 


पालकांचा अभिप्राय यावरून आपण विद्यार्थ्यांचे *मूल्यमापन* करू शकतो. 


उदाहरण 2) यात आपण एकापेक्षा जास्त अध्ययन निष्पत्ती घेऊ आणि दोन-तीन अध्ययन निष्पत्ती मिळून एकच कृती पत्रिका तयार करू. जी पी पी टी मध्ये आहे. 


उदाहरण 3) यात आपण एकाच अध्ययन निष्पत्ती साठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृतींची आखणी आणि मांडणी करून मूल्यमापन करू शकतो. 



कृतींची आखणी अध्ययन निष्पत्ती वरून करता येईल. कृतींची मांडणी करण्यासाठी पीपीटी मध्ये माहिती दिलेली आहे, आवश्यकता असल्यास ग्रुपमध्येही मार्गदर्शन होईल. 


सर्वप्रथम कोणती अध्ययन निष्पत्ती घेतली की त्या मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कृती घालता येतील याबाबत विचार करू, पाठ्यपुस्तकात अध्ययन निष्पत्ती च्या समोर दिलेल्या कृती या किमान आहेत कमाल आपण कितीही आणि कोणत्याही प्रकारच्या कृती घेऊ शकतो पण आपणाला त्या अध्ययन निष्पत्ती त्या कृतीमधून साध्य करून घेता यायला हव्यात.

Comments